Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकाच डॉक्टरकडून करीना, बबिताची डिलिव्हरी

By admin | Updated: December 21, 2016 23:03 IST

रुग्णालयात ज्या डॉक्टरने करीना कपूरची डिलिव्हरी केली. त्याच डॉक्टरने करीनाची आई बबिता यांची सुद्धा डिलिव्हरी केल्याचे समजते.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 - बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी छोटे नवाब अवतरले आहेत. काल सकाळी ७.३०च्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात करीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या मुलाचे नाव तैमूर अली खान पतौडी असे ठेवण्यात आले आहे. एक मजेशीर बाब म्हणजे, रुग्णालयात ज्या डॉक्टरने करीना कपूरची डिलिव्हरी केली. त्याच डॉक्टरने करीनाची आई बबिता यांची सुद्धा डिलिव्हरी केल्याचे समजते. 
मिळालेल्या माहितीनुसार, रुस्तम पी सूनावाला असे या डॉक्टरचे नाव असून ते प्रसूती तज्ज्ञ आहेत. डॉ. रुस्तम यांनी काल करीनाची डिलिव्हरी केली. त्यांनीच करीनाच्या आई बबिती यांची सुद्धा डिलिव्हरी केली होती. तसेच, अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू सिंगची सुद्धा डिलिव्हरी  डॉ. रुस्तम यांनी केली होती. 
(करीना-सैफच्या घरी 'बेबी बॉय'चे आगमन)
(राजांच्या राजाला म्हणतात तैमूर)
दरम्यान, सैफ आणि करीना यांनी मुलाच्या जन्माबद्दल काल एक निवेदन जारी केले. यामध्ये मुलाचे नाव तैमूर अली खान पतौडी असे ठेवण्यात आल्याचे सांगितले. तसेच, मीडियाने केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी धन्यवाद दिले असून सर्व चाहत्यांनी दिलेले आशिर्वाद व शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत.