सुशांतसिंग राजपूत आणि कृती सेनन यांच्या आगामी चित्रपट ‘राब्ता’ मध्ये दीपिका पदुकोन ही एक आयटम साँग करणार आहे. त्यामुळे ती सध्या बुडापेस्टमध्ये आहे. होमी अदजानिया यांनी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यात ते दोघे खुप चांगल्या मुडमध्ये दिसत आहे. ती बुडापेस्टमध्ये आल्याचे त्याने या व्हिडीओत सांगितले आहे. ‘राब्ता’ हा दिग्दर्शक दिनेश विजन यांचा रोमँटीक चित्रपट असून यात कृती-सुशांत हे मुख्य भूमिकेत दिसतील. दीपिका मात्र तिचा हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स’ च्या रिलीज होण्याची वाट पाहत आहे.
आयटम साँगसाठी डिप्पी बुडापेस्टमध्ये!
By admin | Updated: June 1, 2016 02:37 IST