‘हॅप्पी न्यू ईअर’ या चित्रपटातील ‘लवली’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यात दीपिका मोहिनी अवतारात दिसत असून तिचे स्मोकी आईज या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. पंजाबी तालावरील या गाण्यात दीपिकाचा आजवरचा सर्वांत बोल्ड लूक दिसला असल्याचे सांगण्यात येत आहे. गाण्याला कनिका कपूर आणि डॉ. जेशस यांचा आवाज आहे. दीपिकाचे लवली साँग या चित्रपटाच्या लोकप्रियतेत भरच घालणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या या चित्रपटात दीपिकासोबत शाहरुख खान, अभिषेक बच्चन, बोमण इराणी आणि सोनू सूदही मुख्य भूमिकेत दिसतील.
दीपिकाचा मोहिनी अवतार
By admin | Updated: September 23, 2014 06:31 IST