Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका शिकतेय बंगाली भाषा

By admin | Updated: November 24, 2014 02:33 IST

चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटासाठी तामिळ आणि ‘हॅप्पी न्यू ईअर’साठी मराठी भाषा शिकल्यानंतर आता अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘पीकू’ या चित्रपटासाठी बंगाली भाषा शिकत आहे

‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटासाठी तामिळ आणि ‘हॅप्पी न्यू ईअर’साठी मराठी भाषा शिकल्यानंतर आता अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘पीकू’ या चित्रपटासाठी बंगाली भाषा शिकत आहे. दीपिका दिग्दर्शक शुजित सरकारसोबत वर्कशॉप करीत असून अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांची मदत घेत आहे. दीपिका सांगते, मी ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये तमिळी, ‘रामलीला’मध्ये गुजराती ‘हॅप्पी न्यू ईअर’मध्ये मराठी आणि ‘फाइंडिंग फॅनी’मध्ये गोव्याच्या मुलीची भूमिका केली होती. आता ‘पीकू’मध्ये मी बंगाली मुलीच्या भूमिकेत आहे. त्यामुळे मी आता बंगाली शिकत आहे. बंगाली खूपच छान आणि प्रेमळ भाषा आहे. वेगवेगळ्या भाषा शिकण्याची मजाही वेगळीच आहे. शिकण्याचा अनुभवही वेगळा असतो.