Join us  

Cannes 2022 : अनोख्या ड्रेसमुळे दीपिकाचे हाल, कान्स रेड कार्पेटवर गाऊन सांभाळता सांभाळता आले नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:39 AM

Deepika Padukone in orange gown at Cannes 2022: पूर्णवेळ दीपिका तिचा ड्रेस सांभाळतानाच दिसली. तो सांभाळता सांभाळता तिच्या नाकीनऊ आलं.

Deepika Padukone in orange gown at Cannes 2022:  दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या कान्स सोहळ्यात (Cannes 2022) ज्युरी म्हणून मिरवतेय. कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिकाचे अनेक लुक पाहायला मिळाले. पण एक लुक तिच्यासाठी डोकेदुखी ठरला. इतका की, पूर्णवेळ दीपिका तिचा ड्रेस सांभाळतानाच दिसली. तो सांभाळता सांभाळता तिच्या नाकीनऊ आलं.कान्सच्या रेड कार्पेटवरचा दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. यात ती ऑरेंज कलरच्या गाऊनमध्ये दिसली. या गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. पण हा गाऊन सांभाळताना तिला मोठी कसरत करावी लागली.  सोशल मीडियावरच्या युजर्सनी दीपिकाची ही कसरत पाहून तिची चांगलीच मजा घेतली.

व्हिडीओत दीपिका ज्युरी मेंबर्ससोबत पोझ देताना दिसतेय. अख्ख्या व्हिडीओत ती ड्रेस सावतेय. तिच्या चेहऱ्यावरचा वैताग स्पष्ट दिसतोय. पण कॅमेऱ्यांना पोझ देताना हा वैताग दिसू नये, याचाही ती प्रयत्न करतेय.दीपिकाचा हा व्हिडीओ समोर येताच, नेटकऱ्यांनी तिची मजा घ्यायला सुरूवात केली. यावरच्या भन्नाट कमेंट्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. दीपिका या ड्रेसमुळे इतकी वैतागलेली पाहून, ‘आता डिझाइनरचा जॉब तर गेलाच,’ अशी कमेंट एकाने केली आहे. चला, झाडू पोछा झाला..., असं एकाने लिहिलं आहे. ‘हे लोक असे कपडे का घालतात?,’अशी कमेंट अन्य एकाने केली आहे. 

यंदाच्या कान्स सोहळ्यात दीपिका पादुकोण ज्युरी म्हणून सामील झालेली आहे. त्यामुळे तिच्या रेड कार्पेट लुककडे सर्वांचं लक्ष आहे. पहिल्या दिवशी दीपिका सब्यसाची मुखर्जीनं डिझाईन केलेली साडी घालून रेड कार्पेटवर उतरली होती. पण तिचा हा लुकही चाहत्यांना फार काही आवडला नव्हता.विशेषत: तिचा मेकअप पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केलं होतं. यानंतर तिच्या हेअरस्टाईलमुळेही ती ट्रोल झाली होती.

टॅग्स :दीपिका पादुकोणकान्स फिल्म फेस्टिवल