Join us  

Cannes Film Festival 2022: दीपिकाचा कान्स लुक पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘खिल्जी’, काहींना आठवला शहामृग...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 12:46 PM

Deepika Padukone Cannes Look: कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सध्या दीपिका पादुकोणची जोरदार चर्चा होतेय. कान्स सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील तिचे एक ना अनेक लुक व्हायरल होत आहेत.

Deepika Padukone Cannes Look: कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये (Cannes Film Festival 2022) सध्या दीपिका पादुकोणची (Deepika Padukone ) जोरदार चर्चा होतेय. कान्स सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील तिचे एक ना अनेक लुक व्हायरल होत आहेत. अगदी पहिल्या दिवशीच्या ब्लॅक साडीपासून गाऊनपर्यंतच्या तिच्या लुकची इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. काही लुक चाहत्यांना आवडले तर काही लुकवरून दीपिका ट्रोलही झाली. बुधवारी अशाच एका लुकवरून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा दीपिकाची मजा घेतली.

कान्स सोहळ्याच्या 7 व्या दिवशी ... या ब्रँडचा ब्लॅक शिमरी ड्रेस घालून दीपिका रेड कार्पेटवर उतरली.  या आऊटफिटसोबत मॅचिंग रिंग्स आणि इअररिंग्स, स्मोकी आईज आणि न्यूड लिपस्टिकसोबत दीपिकाचा हा ग्लॅमरस अवतार अनेकांना आवडला. काहींनी मात्र दीपिकाचा हा लुक पाहून तिची चांगलीच मजा घेतली. अनेकांना दीपिकाचा हा लुक पाहून ‘पद्मावत’मध्ये रणवीर सिंगने साकारलेला ‘खिल्जी’ आठवला. काहींना शहामृृृग तर काहींना हत्तीचे कान आठवले.

शहामृग दिसत आहेस, अशी कमेंट करत एका युजरने दीपिकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अन्य एकाने ‘हा ड्रेस कमी अन् हत्तीचे कान जास्त दिसत आहे,’अशी कमेंट केली. अनेकांनी रणवीरने साकारलेल्या खिल्जीच्या लुकशी दीपिकाच्या ड्रेसची तुलना केली.

यंदाच्या कान्स सोहळ्यात दीपिका पादुकोण ज्युरी म्हणून सामील झालेली आहे. त्यामुळे तिच्या रेड कार्पेट लुककडे सर्वांचं लक्ष आहे. पहिल्या दिवशी दीपिका सब्यसाची मुखजीर्नं डिझाईन केलेली साडी घालून रेड कार्पेटवर उतरली होती. पण तिचा हा लुकही चाहत्यांना फार काही आवडला नव्हता.विशेषत: तिचा मेकअप पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केलं होतं. यानंतर तिच्या हेअरस्टाईलमुळेही ती ट्रोल झाली होती. 

टॅग्स :दीपिका पादुकोणकान्स फिल्म फेस्टिवल