बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोन अपयशाला घाबरत नाही. तिच्या मते तिचे करिअर नेहमीच टॉपवर राहील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. रेस-2, ये जवानी है दिवानी, चेन्नई एक्स्प्रेस आणि गोलियो की रासलीला रामलीला सारख्या चित्रपटांच्या यशानंतर दीपिकाचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जात आहेत. ती म्हणाली, ‘मी आजवर केलेल्या कठोर मेहनतीचे हे फळ आहे. मागील तीन-चार चित्रपटांमध्ये मी वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. त्यामुळे मी खुश आहे. लोकांना काय आवडते आणि काय नाही, यावर एखाद्याचे करिअर अवलंबून असते. ज्यांना माङो चित्रपट पाहायला आवडत नव्हते, तेच लोक माङो चित्रपट पाहत आहेत. माङो करिअर नेहमीच टॉपवर राहू शकत नाही.’