Join us

दीपिकाने बॉलीवूड दिग्गजांना केले नाराज

By admin | Updated: June 6, 2014 21:07 IST

अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आता सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे.

अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आता सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे. तिचा भाव आता एवढा वाढला आहे की,  बॉलीवूडच्या अनेक दिग्गजांना नाराज करणो तिला गैर वाटत नाही. सूत्रंनुसार दीपिका सध्या रजनीकांत यांच्यावर नाराज आहे. एवढेच नव्हे, तर तिने सलमानसोबत प्रेम रतन धन पायो या चित्रपटात काम करायलाही नकार दिला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रनुसार दीपिकाची कोचादाईयाँमधील भूमिका प्रमोट 
करण्यात न आल्याने ती नाराज होती, त्यामुळेच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती कोणत्याच कार्यक्रमात सहभागी झाली नाही. एवढेच नव्हे, तर करण 
जोहरच्या शुद्धी या चित्रपटात काम करायलाही तिने नकार दिला आहे.