मराठी कलाकार सामाजिक कामे करण्यात नेहमीच तत्पर असल्याचे पाहायला मिळते. दीपाली सय्यदने तिच्या एफबी अकाउंटवर केलेल्या पोस्टमुळे याचा प्रत्यय आला. दीपालीने आपल्या पोस्टमध्ये एक महिन्याच्या मुलीची आई वारली आहे. त्या मुलीला आता नवे आयुष्य देण्याची गरज आहे. जर कोणत्या कुटुंबाला मूल दत्तक घ्यायचे असेल तर त्यांनी यासाठी पुढे यावे, असे म्हटले आहे; आणि संबंधित व्यक्तीचा मोबाइल नंबर देत ही बातमी अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्याचेही आवाहन केले आहे. मराठी कलाकार आपली सामाजिक बांधिलकी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त जपत आहेत.
दीपालीची सामाजिक जाणीव
By admin | Updated: March 14, 2015 01:01 IST