सामान्य व्यक्तीपासून बॉलीवूड सेलिब्रिटीही त्यांच्या शाळेतील दिवस आठवताना दिसतात. अभिनेत्री दीपिका पदुकोनही सध्या तिच्या शाळेच्या दिवसांतील आठवणी सांगताना दिसते. कारण लवकरच ती तिच्या शाळेत होणा:या एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जाणार आहे. बंगळुरूमध्ये असलेल्या दीपिकाच्या शाळेत शिकणा:या विद्याथ्र्याना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फंड मिळवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दीपिकाने या कार्यक्रमाला हजेरी लावली, तर कार्यक्रमाला चांगला रिस्पॉन्स मिळेल, असे शाळेच्या व्यवस्थापनाला वाटते.