Join us
Daily Top 2Weekly Top 5

शीना बोरा हत्याकांडावर आधारित 'डार्क चॉकलेट'चा ट्रेलर रिलीज

By admin | Updated: February 19, 2016 13:47 IST

संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या शीना बोरा हत्याकांडावर आधारीत 'डार्क चॉकलेट' सिनेमाचा ट्रेलर इंटरनेटवर रिलीज झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १९ - संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या शीना बोरा हत्याकांडावर आधारीत 'डार्क चॉकलेट' सिनेमाचा ट्रेलर इंटरनेटवर रिलीज झाला आहे. ट्रेलर व्यतिरिक्त या सिनेमाशी संबंधित अन्य कुठलीही गोष्ट प्रसिध्द करु नये असे मुंबई उच्च न्यायालयाने निर्माता आणि दिग्दर्शकाला निर्देश दिले आहेत. 
 
पीटर मुखर्जीची बहिण शानगोम दास गुप्ता यांनी डार्क चॉकलेट या बंगाली सिनेमाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. डार्क चॉकलेटमध्ये महिमा चौधरी इंद्राणीच्या भूमिकेत तर, हॉट रिया सेना शीनाची भूमिका करत आहे.  
 
हा चित्रपट प्रदर्शित झाला तर, पीटर मुखर्जीच्या निष्पक्ष सुनावणीच्या संधीवर परिणाम होईल असे शानगोम यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. या हायप्रोफाईल हत्याकांडात पीटर मुखर्जीही आरोपी आहे. 
 
शीना ही इंद्राणी मुखर्जीची मुलगी होती. पण इंद्राणीने सर्वांना ती आपली बहिण असल्याचे सांगितले होते. पण नंतर इंद्राणीने दुसरा पती आणि ड्रायव्हरच्या मदतीने शीनाचा काटा काढला. रायगडच्या जंगलात नेऊन शीनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.