Join us

हनुमानाच्या भूमिकेसाठी दारा सिंहने सोडलं होतं नॉनव्हेज; दिवसाला खायचे १०० बदाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:31 PM

Dara singh: कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चीत करणाऱ्या दारा सिंह यांचा आहार चांगलाच दणकट होता. मात्र, एका भूमिकेसाठी त्यांनी चक्क त्यांच्या आहारात बदल केला होता.

कुस्तीपटू, अभिनेता, दिग्दर्शक, राजकीय व्यक्ती अशा कितीतरी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेला व्यक्ती म्हणजे दारा सिंह (dara singh). त्यांचं निधन होऊन आज बराच काळ लोटला मात्र, त्यांच्याविषय़ीचे अनेक किस्से आजही चाहत्यांमध्ये रंगतात. यात सध्या त्यांच्या फिल्मी करिअर आणि फिटनेसची चर्चा रंगली आहे. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चीत करणाऱ्या दारा सिंह यांचा आहार चांगलाच दणकट होता. मात्र, एका भूमिकेसाठी त्यांनी चक्क त्यांच्या आहारात बदल केला होता. त्यांनी नॉनव्हेज सोडून दिलं होतं.

रुस्तम-ए-हिंद या नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या दारा सिंह यांच्या फिटनेसमुळे त्यांच्याकडे अनेक सिनेमाच्या ऑफर्स येत होत्या. त्यामुळे दारा सिंह यांची बॉलिवूडमध्येही एन्ट्री झाली. विशेष म्हणजे एका भूमिकेसाठी दारा सिंह यांनी नॉनव्हेज खाणं बंद केलं होतं.

दारा सिंह पहेलवान असल्यामुळे त्यांचा आहारदेखील तितकाच जास्त होता. ते दिवसाला २ लीटर दूध, अर्धा किलो मटण,  तूप, १० पोळ्या, १०० काजू, काजू-मनुका आणि चांदीचा वर्ख असा दणकट आहार घ्यायचे. परंतु, एका सिनेमामध्ये त्यांना हनुमानाची भूमिका साकारायची होती. ज्यासाठी त्यांनी त्यांच्या डाएटमधून नॉनव्हेज पूर्ण बंद केलं होतं.

'रामायण' या सिनेमामध्ये दारा सिंह, हनुमानाची भूमिका साकारत होते. त्यामुळे देवाची भूमिका करत असताना नॉनव्हेज पदार्थांना स्पर्श करायचा नाही असं त्यांनी ठरवलं आणि डाएटमधून नॉनव्हेज वगळलं. त्याऐवजी त्यांनी आहारात काजू-बदामचं प्रमाण वाढवलं. दरम्यान, दारा सिंह यांच्या आहाराकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्यासोबत दोन माणसं असायची. ही माणसं दर १०-१५ मिनिटांनी दारा यांना काजू-बदाम खायला द्यायचे. ते कायम त्यांच्यासोबत काजू-बदाम घेऊन फिरायचे. तसंच ते सकाळचा नाश्ता कधीच करायचे नाहीत. दुपारचं आणि रात्रीचं जेवण यामध्येच ते डाएट फॉलो करायचे. इतकंच नाही तर तगडा आहार घेणारे दारा सिंह आठवड्यातील एक दिवस काहीही न खाता उपाशी रहायचे.

टॅग्स :दारा सिंगबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी