Join us
Daily Top 2Weekly Top 5

सपना चौधरीच्या नागिन डान्सचा सोशल मीडियात धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 16:36 IST

सपनाची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन तिने डान्स केला तर तिचे डान्स व्हिडीओ व्हायरल होतात.

मुंबई : हरियाणवी डान्सर सपना चौधरी बिग बॉस सीझन ११ मध्ये येऊन गेल्यापासून आपल्या डान्समुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या डान्सचे आता देशभरात चाहते झाले आहेत. सपनाच्या डान्सचे व्हिडीओ परदेशातही गाजत आहेत. 

सपना आता डान्सरसोबतच भोजपुरी सिनेमांची अभिनेत्री देखील झाली आहे. सपनाची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन तिने डान्स केला तर तिचे डान्स व्हिडीओ व्हायरल होतात. सपनाचा असाच एक डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. 

या व्हिडीओमध्ये सपना चौधरी ही तिच्या लोकप्रिय 'तेरा आंख्या का यो काजल' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. याच गाण्यावर ती नागिस डान्स करतानाही दिसली आहे. प्रेक्षकांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. 

टॅग्स :सपना चौधरीबॉलिवूड