Join us
Daily Top 2Weekly Top 5

दगडूला मिळाली प्राजक्ता

By admin | Updated: March 14, 2015 22:49 IST

टाइमपास-२’मध्ये दगडू-प्राजक्ताच्या भूमिकेत कोण असणार, याचे सीक्रेट रवि जाधवने अखेर रिव्हील केले आहे

टाइमपास-२’मध्ये दगडू-प्राजक्ताच्या भूमिकेत कोण असणार, याचे सीक्रेट रवि जाधवने अखेर रिव्हील केले आहे. गंमत म्हणजे सोशल साइट्सवर दगडूसह ज्या अभिनेत्रींचे आणि प्राजूसह ज्या अभिनेत्यांचे फोटो अपलोड केले होते, त्यापैकी कोणाचीच वर्णी या भूमिकांसाठी लागली नाही. रवि जाधवने दगडूच्या भूमिकेसाठी प्रियदर्शन जाधवची निवड केली असून, दगडूची प्राजू म्हणून प्रिया बापटने बाजी मारली आहे. आता हे तरुण वयातले दगडू-प्राजू काय धमाल करतात, ते पाहण्यासाठी १ मेची वाट पाहावी लागणार आहे.