Join us

क्रिकेटपटू शुबमन गिलच्या मैत्रिणीची शाहरुख खानच्या 'किंग'मध्ये एन्ट्री, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:34 IST

क्रिकेटपटू शुबमन गिलच्या मैत्रिणी देखील 'किंग'मध्ये दिसू शकते अशी चर्चा आहे. 

ज्याला बॉलिवूडचा बादशहा म्हटले जाते, असा लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान लवकरच 'किंग' (King) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात शाहरुखसोबत त्याची लाडकी लेक सुहाना खानदेखील दिसणार आहे.  'किंग' (King) सिनेमाचं सध्या जोमात शुटिंग सुरु आहे. आता सिनेमाबाबतीत आणखी एक अपडेट समोर आलं आहे. क्रिकेटपटू शुबमन गिलच्या मैत्रिणी देखील 'किंग'मध्ये दिसू शकते अशी चर्चा आहे. 

बॉलिवूड हंगामानुसार,  सोनम बाजवा (Sonam Bajwa) किंगमध्ये शाहरुख खानच्या विरुद्ध दिसणार आहे. ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार नाही. तिची कॅमिओ पण महत्त्वपूर्ण भुमिका असेल. पंजाबी चित्रपटांमध्ये दिसणारी ही अभिनेत्री बऱ्याच काळापासून हिंदी दिग्दर्शकांची पहिली पसंती आहे. ती आधीच दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यामध्ये अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ५' आणि टायगर श्रॉफचा 'बागी ४'चा समावेश आहे. सोनम बाजवा ही शुबमनची सर्वात जवळची मैत्रीण आहे. 

चित्रपटात तिचे पात्र कसे असेल हे निर्मात्यांनी अद्याप उघड केलेले नाही. या रिव्हेंज अ‍ॅक्शन चित्रपटात सोनम बाजवाची भूमिका कशी असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'पठाण' आणि 'वॉर' सारखे सिनेमे बनवणारे सिद्धार्थ आनंद 'किंग'चं दिग्दर्शन करणार आहेत.  

टॅग्स :शाहरुख खानशुभमन गिलसुहाना खान