Join us

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर: जॉन अब्राहम, एकता कपूरनंतर प्रेम चोप्रा यांनाही कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 19:44 IST

Prem Chopra Corona Positive: प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा देखील कोरोनाच्या विळख्यात आले आहेत.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा (Prem Chopra) आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा (Uma Chopra) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूडमध्ये कोरोना (Corona)चा कहर वाढतो आहे.  ८६ वर्षीय अभिनेते प्रेम चोप्रा कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रेम चोप्रा यांच्या आधी एकता कपूर, जॉन अब्राहम, डेलनाज इराणी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते आहे. या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीला एक-दोन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात येईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉ जलील पारकर प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीची काळजी घेत आहेत. दोघांना मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल देण्यात आले आहे. दोघेही बरे होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अभिनेते प्रेम चोप्रा यांनी हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे. प्रेम चोप्रा अलिकडेच यशराजच्या 'बंटी और बबली २' या चित्रपटात दिसले होते. प्रेम चोप्रा आणि उमा चोप्रा यांच्या लग्नाला जवळपास ६० वर्षे झाली आहेत. उमा आणि प्रेम यांना रकिता, पुनीता आणि प्रेरणा चोप्रा या तीन मुली आहेत. उमा चोप्रा या दिग्गज अभिनेते राज कपूर यांच्या बहिण आहेत.

टॅग्स :प्रेम चोपडाकोरोना वायरस बातम्या