Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona Effect :क्वारंटाईनचा असा उपयोग करतेय शेवंता, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 13:44 IST

अपूर्वा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे

भारतात जीवघेण्या कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनानं आतापर्यंत 101 बाधित असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 101वर गेला आहे. सर्वसामन्य ते सेलिब्रेटी सगळ्यांनीच स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. 

रात्रीस खेळ चालेमधील शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकरने देखील स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. सध्या ती तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवते आहे. अपूर्वा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. फोटोत अपूर्वाच्या आजूबाजूला खाण्याचे पदार्थ ठेवलेले दिसतायेत. अपूर्वाने क्वारंटाईनमध्ये घराच्यांसाठी पाणीपुरी बनवली आहे. अपूर्वाच्या व्हिडीओ आणि फोटोला चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रतिसाद दिला आहे. 

रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने जशी प्रेक्षकांची मनं जिंकलीत, तसेच या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शेवंता आणि अण्णांच्या अदाकारीचे तर चाहते डाय हार्ट फॅन बनलेत. शेवंताची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अपूर्वाच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

टॅग्स :अपूर्वा नेमळेकर