Join us

‘बुगडी...’चा तिकीटबारीवर चुकला ठेका

By admin | Updated: March 19, 2015 23:05 IST

लावणीचा झटकाच चुकल्याने ‘बुगडी माझी सांडगी गं...’ चित्रपटाचा तिकीटबारीवर ठेका चुकला असून, या चित्रपटाची फ्लॉपमध्ये गणती झाली आहे.

लावणीचा झटकाच चुकल्याने ‘बुगडी माझी सांडगी गं...’ चित्रपटाचा तिकीटबारीवर ठेका चुकला असून, या चित्रपटाची फ्लॉपमध्ये गणती झाली आहे. मराठी मनाला अजूनही भुलविणारी ठसकेबाज लावणी ‘बुगडी माझी...’चे नाव चित्रपटाला देऊन हिंदी चित्रपटांच्या शीर्षकाची स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला गेला. पण कथा, पटकथा, संवाद आणि तब्बल ९ गाणी या कशातच नसलेला दम आणि नायक-नायिका काय करताहेत हे त्यांचे त्यांनाच माहीत नसल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला पूर्ण नाकारले आहे. कथा, पटकथाच ठिसूळ आणि प्रभावहीन मांडणी यामुळे हा चित्रपट पाहणे प्रेक्षकांना एक शिक्षाच ठरते.