सतीश मोतलिंग दिग्दर्शित आगामी ‘३५ टक्के काठावर पास’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. संपूर्ण टीमच्या हस्ते या चित्रपटाच्या पहिल्यावहिल्या ट्रेलरचे लॉंचिंग करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश मोतलिंग, निर्मात्या सेजल शिंदे , अमित भानुशाली उपस्थीत होते. प्रथमेश परब हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे . 'आयली' च्या निमित्ताने एक नवोदित अभिनेत्री मराठी चित्रसृष्टीत दाखल होतेय. चित्रपटातील प्रमुख भूमिकांसोबतच संजय नार्वेकर, सुशांत शेलार, भाग्यश्री संकपाळ हे चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. समीर सप्तिसकर यांचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे. शाळकरी तसेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारी टक्यांची स्पर्धा,त्यातील यशापयशाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम यांवर अत्यंत मार्मिक आणि विनोदी पद्धतीने भाष्य या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. विषय गंभीर असला तरीही त्याला विनोदाची झालर असल्याने हलक्याफुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर येईल असे मत चित्रपटाच्या निर्मात्या सेजल शिंदे यांनी सांगितले. यशमोहन आपटे,माधवी जुवेकर,विजय पाटकर, भारत गणेशपुरे, जयेश चव्हाण,चैतन्य आडकर, पंकज पडघन आदी कलाकार उपस्थीत होते.
परिणितीला लग्नाआधीच हवे बाळ!
By admin | Updated: May 1, 2016 02:17 IST