Join us

कल्की आणि नसीरुद्दीन यांची जोडी

By admin | Updated: November 18, 2014 02:01 IST

लंडन-पॅरिस-न्यूयॉर्कचे दिग्दर्शन करणाऱ्या अनू मेननच्या ‘वेटिंग’ या चित्रपटात कल्की कोचलीन आणि नसीरुद्दीन शाह यांची जोडी पहायला मिळणार आहे

लंडन-पॅरिस-न्यूयॉर्कचे दिग्दर्शन करणाऱ्या अनू मेननच्या ‘वेटिंग’ या चित्रपटात कल्की कोचलीन आणि नसीरुद्दीन शाह यांची जोडी पहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा दोन अनोळखी व्यक्तींची आहे, जे कोमात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांची वाट पाहत असताना एका दवाखान्यात भेटतात. सूत्रांनुसार हा एक विनोदी चित्रपट असणार आहे. कल्की आणि नसीर यांची जोडी थोडी वेगळी वाटत असली, तरी या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे नाटकांप्रतीचे प्रेम. त्यामुळे मोठ्या पडद्यावरही ही जोडी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करील अशी अपेक्षा आहे.