Join us
Daily Top 2Weekly Top 5

को-स्टारने दारू पिऊन काजलची काढली छेड

By admin | Updated: March 22, 2017 21:55 IST

एका चित्रपटावेळी दारूच्या नशेत को-स्टारने केलेल्या कारनाम्यामुळे प्रचंड वेदनेचा सामना करावा लागल्याचा खुलासा अभिनेत्री काजल अग्रवालने केला आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 -  एका चित्रपटावेळी दारूच्या नशेत को-स्टारने केलेल्या कारनाम्यामुळे प्रचंड वेदनेचा सामना करावा लागल्याचा खुलासा अभिनेत्री काजल अग्रवालने केला आहे. एका ऑफिशियल अ‍ॅप लॉन्चिंगप्रसंगी तिने हा अनुभव सांगितला. सिंघम, स्पेशल 26 आणि दो लफ्जो की कहानी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने आपला जम बसवला आहे. 

काजलने सांगितले की, गेल्या वर्षी जून महिन्यात साउथच्या एका चित्रपटाच्या फायनल शेड्यूलच्या गाण्याचे शूटिंग सुरू होते. मात्र याच दरम्यान तिच्या को-स्टारने तिच्या कमेरेवर जोरात चिमटा घेतला. त्यामुळे तिला प्रचंड वेदना झाल्या. तिने लगेचच शूटिंग थांबविण्यास सांगितले. जेव्हा असिस्टंट डायरेक्टने संबंधित घटनेबाबत माहिती घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, संबंधित को-स्टार हा दारूच्या नशेत होता. त्यांनी लगेचच त्याला शूटिंग स्थळावरून बाहेर काढले. वास्तविक त्या को-स्टारला काजलच्या कमरेवर हात ठेवून डान्स करायचा होता. परंतु त्याने हात न ठेवताच तिच्या कमरेला दाबत जोरदार चिमटा काढला. त्यामुळे काजलला प्रचंड वेदना झाल्या होत्या. जेव्हा संपूर्ण परिस्थिती निवळली तेव्हा काजलने रिटेक घेत पुन्हा गाण्याच्या सीनला सुरुवात केली.काजलसोबत असा प्रसंग पहिल्यांदाच झाला असे नाही, तर दो लफ्जों की कहाणी या चित्रपटादरम्यान तिचा को-स्टार रणदीप हुड्डा यानेही किसिंग सीन देताना असाच काहीसा प्रताप केला होता. रणदीपला स्क्रिप्ट व्यतिरिक्तच हा सीन करायचा होता. त्याने काजलला काही कळण्याच्या आतच किस करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काजल चांगलीच गोंधळून गेली होती.