Join us

चाइल्ड आर्टिस्टच्या ‘बाप’ भूमिका

By admin | Updated: July 26, 2015 12:25 IST

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु या चर्चेला एक वेगळा कंगोरा लाभला आहे. या बिगबजेट चित्रपटाचे नायक-नायिका सलमान खान व करिना कपूर असले

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु या चर्चेला एक वेगळा कंगोरा लाभला आहे. या बिगबजेट चित्रपटाचे नायक-नायिका सलमान खान व करिना कपूर असले तरी प्रत्यक्ष पडद्यावर त्यांच्यापेक्षा जास्त लक्ष चित्रपटातील शाहिदा म्हणजेच हर्षाली मल्होत्रानेच वेधले आहे. बोलक्या डोळयांची व गोड चेहऱ्याची ही चिमुकली संपूर्ण चित्रपटात एखाद्या पारंगत कलावंतासारखी वावरली आहे. न बोलताही खूप काही बोलणारे शाहिदाचे पात्र टॉकिजमधून बाहेर पडल्यावरही अनेक दिवस नजरेपुढून हलत नाही. दिग्गज कलावंतांची फौज सभोवताल असतानाही आपल्या अद्वितीय अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी हर्षाली एकटीच नाही. याआधीही अनेक बालकलावंतांनी अशीच प्रसिद्धी मिळवली आहे. सना सईदशाहरूख खानचा कुछ कुछ होता है या चित्रपटातही एक अशीच खोडकर मुलगी होती. सिनेमातले तिचे नाव अंजली. आईच्या मृत्यूनंतर आपल्याला वडिलांचे एकाकीपण संपविण्यासाठी त्यांच्या मैत्रिणीला शोधून काढणाऱ्या अंजलीचे खरे नाव आहे सना सईद. स्टूडंट आॅफ दि ईअर या चित्रपटात भूमिका करणारी सना ‘झलक दिखला जा’ या शोमध्येही झळकली होती. आयशा कपूर अमिताभ-राणी मुखर्जीच्या गाजलेल्या ब्लॅक चित्रपटातील छोटी राणी आठवतेय का? तिचेच नाव आहे आयशा कपूर. केवळ १० वर्षांच्या वयात आंधळी, बहिरी आणि मुक्या मुलीची भूमिका साकारून आयशाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. तिच्या या सुंदर भूमिकेसाठी आयशाला आयफा व अन्य अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. आता ती चिमुकली आयशा चांगली तरुण झाली असून लवकरच पाणी चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे. कुणाल खेमू‘‘यंहा सब गडबड हैं उस्ताद...नरम गरम हैं और गरम नरम हैं’’ अशी जोरदार डॉयलॉगबाजी करीत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा राजा हिंदुस्थानी मधला छोटा बच्चा म्हणजे आजचा कुणाल खेमू आहे. या सिनेमातील त्याची भूमिका विशेष गाजली होती. आपल्या उस्तादसारखाच हजर जवाबी असणारा कुणाल पुढे खूप मोठा होईल, असे भाकित तेव्हाच वर्तवले गेले होते. ते काहीअंशी खरे ठरले. कुणाल कलावंत म्हणून फार गाजला नाही. परंतु सोहाअली खानशी त्याचे प्रेमप्रकरण व पुढे लग्न मात्र गाजत व वाजत राहिले.