Join us

...म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले अक्षय कुमारचे फॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 19:02 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे चाहते झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 4 - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे चाहते झाले आहेत. अक्षय कुमारने केलेल्या कामावर ते भलतेच खूष आहेत.
 
 केंद्र आणि राज्य सरकारच्या "हागणदारी मुक्त"(ओडीएफ) या कार्यक्रमाला समर्थन दिल्याबद्दल अक्षयचं चौहान यांनी कौतूक केलं आहे. "टॉयलेट: एक प्रेम कथा" हा अक्षयचा आगामी सिनेमा आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षयने मध्य प्रदेशच्या खरगौन येथे एक शौचालय बांधण्यासाठी हातभार लावला. 
 
सोमवारी (दि.3) चौहान यांनी अक्षय कुमारसोबतचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या हागणदारी मुक्त(ओडीएफ) या कार्यक्रमाला समर्थन दिल्याने अक्षय कुमार कौतुकास पात्र आहे. अक्षयमुळे स्वच्छ भारत मिशनसाठी तरूणांना प्रेरणा मिळेल असं ट्विट त्यांनी केलं.