Join us

‘चेन्नई एक्स्प्रेस’ जोडी पुन्हा एकदा एकत्र?

By admin | Updated: August 5, 2016 02:23 IST

शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण ही जोडी सर्वांत पसंत करण्यात येणाऱ्या जोड्यांपैकी एक

शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण ही जोडी सर्वांत पसंत करण्यात येणाऱ्या जोड्यांपैकी एक आहे. त्या दोघांनी याअगोदर ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘ओम शांती ओम’ यामध्ये एकत्र काम केले आहे. आता पुन्हा एकदा ते आनंद एल. राय यांच्या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. सूत्रांनुसार, ‘चित्रपटाबद्दल सर्व चर्चा झाली असून दीपिकादेखील चित्रपट साइन करणार आहे’, हा पूर्णपणे रोमँटिक चित्रपट आहे. तसेच यात काही गाणी-डान्स सिक्वेन्स असणार आहेत. या दोघांना पुन्हा एकदा आॅनस्क्रीन पाहता येऊ शकेल हे त्यांच्या चाहत्यांसाठी फारच उत्साहित करणारे आहे. दीपिका विन डिजेलसोबत ‘ट्रिपल एक्स : द रीटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटात दिसणार आहे. तर शाहरूख खानचा ‘रईस’ आणि गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डीअर जिंदगी’ चित्रपट येतोय.