Join us  

विराटनंतर आता अनुष्का शर्माही गाजवणार क्रिकेटचं मैदान, 3 वर्षानंतर 'क्रिकेटर' बनून करतेय कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 1:10 PM

Chakda Xpress Teaser Video : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या पाठोपाठ आता त्याची पत्नी अनुष्का शर्माही क्रिकेटच्या मैदानात उतरली आहे. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे.

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा  (Anushka Sharma) ही सुद्धा आता क्रिकेटचं मैदान गाजवताना दिसणार आहे. होय, आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. अनुष्का 3 वर्षानंतर   कमबॅक करतेय. तिच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीये. या सिनेमाचं नाव आहे, ‘चकदा एक्प्रेस’ (Chakda Xpress). नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या चित्रपटात अनुष्का एका महिला क्रिकेटपटूची भूमिका साकारणार आहे. ती कोण तर भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार झूलन गोस्वामी  (Jhulan Goswami) हिची व्यक्तिरेखा जिवंत करताना दिसणार आहे. (Jhulan Goswami biopic) 

मेकर्सने ‘चकदा एक्प्रेस’चा टीजर व्हिडीओ रिलीज केला आहे. यात अनुष्काचा फर्स्ट लूक पाहायला मिळतोय. 

क्रिकेटच्या मैदानावर भारत व ऑस्ट्रेलियाचा सामना रंगणार असतो. व्हिडीओमध्ये त्या वेळेची महिला क्रिकेट संघाची अवस्था चित्रित करण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये महिला क्रिकेट संघाला ना स्वत:ची जर्सी असते ना ओळख. शिवाय स्टेडियमवर चिअरअप करण्यासाठी एकही प्रेक्षक नसतो. परंतु अनुष्का शर्मा अर्थातच झूलन गोस्वामीची जिद्द कायम असते. तिची दमदार  एन्ट्री होते,’ असा हा व्हिडीओ आहे. जब जर्सी खुद के नाम का नहीं तो फॅन किस नाम से फॉलो करेगा, लेकिन चिंता मत करो अगर आज जर्सी पर अपना नाम बना लिया तो कल अपनी पहचान भी बना लेंगे, असं ती म्हणते. अनुष्काचा फर्स्ट लूक पाहून चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरु होणार आहे.  

अनुष्का सुमारे 3 वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे कमबॅक करतेय. साहजिकच   हा चित्रपट तिच्यासाठी खूपच खास आहे. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टावर भली मोठी पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘ कथा एका मोठ्या त्यागाची आहे.या चित्रपटामुळे जगाचे डोळे उघडतील, असं तिने यात म्हटलं आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माआत्मचरित्रबॉलिवूडविराट कोहली