Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रिटींनाही भुरळ लकी चार्म्सची

By admin | Updated: July 11, 2016 01:38 IST

बॉलीवूडमधील अनेक असे कलाकार आहेत, ज्यांचा लकी चार्मवर विश्वास आहे. आपल्या यशासाठी किंवा आयुष्यात येणाऱ्या सकारात्मक गोष्टींसाठी हे स्टार्स त्यांच्याजवळ काही साहित्य बाळगतात.

बॉलीवूडमधील अनेक असे कलाकार आहेत, ज्यांचा लकी चार्मवर विश्वास आहे. आपल्या यशासाठी किंवा आयुष्यात येणाऱ्या सकारात्मक गोष्टींसाठी हे स्टार्स त्यांच्याजवळ काही साहित्य बाळगतात. अशाच काही कलाकारांचा सीएनएक्सने घेतलेला हा आढावा.सलमान खान बॉलीवूडचा दबंग खान सलमान याच्या या यशाचे गमक काहीही असले, तरी त्याच्या हातातील निळ्या रंगाच्या ब्रेसलेटकडे लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही. सलमानच्या हातात फिरोजा नावाचे ब्रेसलेट नेहमी असते. हे ब्रेसलेट त्याला त्याच्या वडिलांनी गिफ्ट केले असल्याने तो ते नेहमी हातात घालतो, तसेच फिरोजा हा खडा यश मिळण्यासाठीदेखील घातला जातो. आता सल्लूभाईच्या यशाकडे पाहता, त्याला याचा नक्कीच फायदा झाला, असे म्हणायला काहीच हरकत नाही.शिल्पा शेट्टी बऱ्याच जणांना माहीत नसेल की, शिल्पा शेट्टी तिच्या करंगळीमध्ये एक इमरॅल्ड रिंग घालते. ही रिंग नेहमीच तिच्या बोटात तुम्हाला पाहायला मिळेल. ही शिल्पाची लकी चार्म रिंग असून, आयपीएलच्या तिच्या टीमच्या मॅचेसवेळी शिल्पा दोन्ही हातात घड्याळे घालते. शिल्पाने ही रिंग घातल्यापासून तिचे तारे चमकले, असे तिला वाटते.अमिताभ बच्चन दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचादेखील लकी चार्मवर विश्वास आहे. त्यांच्या हातात तुम्हाला एक घड्याळ नेहमी दिसेल अन ते वॉच अमितजींना त्यांच्या वडिलांनी गिफ्ट केले आहे. एवढेच नाही, तर अमिताभजींच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाच एक निळ्या खड्याची ब्लू सॅफिअर रिंग तुम्हाला दिसेल. असे म्हणतात की, अमितजींच्या पडत्या काळात त्यांनी ही रिंग घातली होती. कुलीच्या वेळी झालेल्या अपघातानंतर त्यांनी एकदमच दमदार कमबॅक केला होता. त्या वेळी ही रिंग त्यांच्या बोटात होती.बिपाशा बसूबोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्री बिपाशा बसूचे तर जगभरात चाहते असतील, पण आपली ही सुंदरा प्रेमात आहे लिंबू मिरचीच्या. हे ऐकून तुम्हाला थोडे विचित्र वाटेलही, पण हेच खरे आहे. बिपाशाचा लिंबू-मिरचीवर विश्वास आहे. बिपाशाच्या कारमध्ये नेहमीच तुम्हाला ते लटकविलेले दिसेल. याविषयी बिपाशा सांगते की, ‘मी दर शनिवारी लिंबू-मिरची विकत घेते अन् कारमध्ये लटकवते. लिंबू-मिरची आपल्याला वाईट शक्तींपासून वाचवते,’ असे बिपाशाचे म्हणणे आहे.रणबीर कपूर हँडसम हंक रणबीर कपूरच्या तर लाखो तरुणी दिवान्या आहेत, पण त्याचा लकी चार्म आहे, त्याची आई नीतू कपूर. होय, आई नीतू कपूर ही त्याची लकी चार्म असल्याचे तो सांगतो, तसेच रणबीरसाठी ८ हा आकडा लकी असल्याचे तो मानतो. रणबीरच्या गाडीचा नंबरदेखील ८ आहे. विद्या बालन उ लाला.. उ लाला ... म्हणणारी विद्या बालन आज बॉलीवूडमध्ये मोठी अभिनेत्री आहे. तिची मेहनत अन् अभिनय या गोष्टी तर तिच्या सक्सेससाठी महत्त्वाच्या आहेतच, परंतु विद्याचे लकी चार्मदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. विद्याच्या हातात तुम्ही काळ््या रंगाचे मोठ्या मण्यांचे ब्रेसलेट पाहाल. हे ब्रेसलेट नेहमीच तिच्या हातात असते. पाकिस्तानमधील हाश्मी काजल ती नेहमी लावते. या दोन गोष्टी तिच्यासाठी लकी असल्याचे ती सांगते.