Join us
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीसाठी शक्य ते प्रयत्न करणार कॅट

By admin | Updated: October 3, 2014 00:20 IST

कॅटरिना कैफ तिची धाकटी बहीण इसाबेल कैफच्या बॉलीवूड पदार्पणाबाबत खुश आहे. इसाबेलच्या फिल्मी करिअरसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे कॅटरिनाने म्हटले आहे.

कॅटरिना कैफ तिची धाकटी बहीण इसाबेल कैफच्या बॉलीवूड पदार्पणाबाबत खुश आहे. इसाबेलच्या फिल्मी करिअरसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे कॅटरिनाने म्हटले आहे. वयाच्या 14 व्या वर्षी मॉडेलिंग करिअरची सुरुवात करणारी इसाबेल डॉ. कॅबी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाची निर्मिती कॅनडियन दिग्दर्शक जीन फ्रँकोसिस आणि सलमान खानने केली आहे. कॅटरिना म्हणाली की,‘सध्या इसाबेल लॉस एंजिलिसमध्ये आहे. तिला बॉलीवूडमध्ये येण्याची इच्छा असेल, तर मी तिच्या मदतीसाठी जे काही करू शकते, ते नक्कीच करेन.’ डॉ. कॅबी हा चित्रपट कॅनडा आणि अमेरिकेत रिलीज झाला असून या चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिक्रियांमुळे कॅट खुश आहे.