Join us
Daily Top 2Weekly Top 5

राधिका आपटेलाही आला होता कास्टिंग काउचचा अनुभव

By admin | Updated: September 22, 2016 15:29 IST

सिनेमात काम मिळवायचं असेल तर अभिनेत्रींना अनेकवेळा निर्माता व दिग्दर्शक वा असल्या कुण्यातरी बड्या हस्तीची शरीरसुखाची मागणी मान्य करावी लागते. अशा कास्टिंग काउचचा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - सिनेमात काम मिळवायचं असेल तर अभिनेत्रींना अनेकवेळा निर्माता व दिग्दर्शक वा असल्या कुण्यातरी बड्या हस्तीची शरीरसुखाची मागणी मान्य करावी लागते. अशा कास्टिंग काउचचा अनुभव अनेक अभिनेत्रींना येतो, काहीजणी झुकतात तर काही जणी अशी मागणी ठोकरतात. राधिका आपटेलाही असाच अनुभव आला होता, असं तिनं बॉलीवूडलाइफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
कास्टिंग काउच बाबत विचारले असता राधिका आपटे म्हणाली की मला अशा लोकांविषयी माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. मला आठवते की, साउथमधील एका अभिनेत्याने मला माझ्या रुमवर फोन करुन फ्लर्टिंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी त्याला नकार दिला. त्याने याचा डूख धरून मला त्रास देण्याचा नंतरही प्रयत्न केला, परंतु मी त्याला फारशी किंमत दिली नाही.
तसेच, त्या पूर्वीही मला एक असाच कॉल आल्याचं तिनं म्हटलं आहे. "या कॉलवरुन एका व्यक्तीने सांगितले की बॉलिवूडमध्ये काहीजण एक चित्रपट बनवत असून त्यासाठी तुमची त्यांना भेट घ्यायची आहे. त्यानंतर तो म्हणाला की त्यांच्यासोबत तुम्हाला रात्र घालवावी लागेल. यावर मला खूप हसायला आले आणि मी यातलं काही करत नाही असं सांगत, त्या व्यक्तिला नरकात जाण्याचा संदेश मी दिला," असं तिनं सांगितलं. 
'पार्च्ड' हा चित्रपट 23 सप्टेंबरला रिलीज होणार असून या चित्रपटातील राधिका आपटेचा सेक्स सीन  लीक झाल्यामुळे खूप चर्चा झाली होती, परंतु अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचाच मार्ग राधिकानं स्वीकारला आहे.