वैभवने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोत वैभव एका लंडनमधल्या कॅफेत बसला आहे. या फोटोच्या खाली त्याने लिहिले आहे कॅफे आणि बरंच काही. लंडनमधले कॅफे बघून बहुदा वैभवला त्याच्या चित्रपट ‘कॉफी आणि बरंच काही’ची आठवण झाली असावी. मग काय वैभवला या कॅफेत बसून फोटो काढण्याचा मोह आवरला नसावा. वैभवने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कॉफी आणि बरंच’ काही या चित्रपटामुळे वैभवला खरी ओळख मिळाली, तर नुकताच आलेल्या ‘बाजारीव मस्तानी’ या चित्रपटातल्या अभिनयामुळे. त्यांने हिंदीतही आपला ठसा उमटविला आहे.
कॅफे आणि बरंच काही!
By admin | Updated: September 30, 2016 03:29 IST