महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणारा, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध संघर्षाची प्रेरणा देणारा ‘कँडलमार्च’ हा चित्रपट येत्या ५ डिसेंबरपासून प्रदर्शित होत आहे. सचिन देव यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. अभिनेत्री स्मिता तांबे, तेजस्विनी पंडित, मनवा नाईक आणि सायली सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख भूमिका त्यात आहेत. निलेश दिवेकर यांची खलनायकाची भूमिका आहे. या चित्रपटातील गीतांना अमितराज यांनी संगीतबद्ध केलं आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायलेलं ‘निखारे’ हे मंदार चोळकर लिखित गीत या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे. चार महिलांवर आधारित हे कथानक आहे. त्यांची जीवनशैली आणि त्यांच्यासमोरचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यांच्या शारीरिक-मानसिक छळाला त्या कशा सामोऱ्या जातात, आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा कशा प्रयत्न करतात याचं मनोवेधी चित्रण या चित्रपटात आहे. आपल्या मानसिकतेबाबात काही प्रश्न उपस्थित करणारा, महिलांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवणारा असा हा चित्रपट आहे.
शुक्रवारी येणार ‘कँडलमार्च!’
By admin | Updated: December 3, 2014 01:55 IST