Join us  

छोट्या stuffy चा जीव वाचवण्यासाठी भाऊ कदमच्या लेकीने उचलला आवाज, स्टोरी केली शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 9:00 PM

मृण्मयी कदमने सोशल मीडियावर एका युझरची पोस्ट शेअर केली आहे.

सध्या प्राण्यांना विशेषकरुन रस्त्यावरील कुत्र्यांना त्रास देण्याच्या घटना सतत घडत आहेत. अनेक श्वानप्रेमी याविरोधात आवाज उठवत आहेत. हिंदी, मराठी सेलिब्रिटी सोशल मीडियावरुन जनजागृती पसरवत आहेत. काहींनी रीतसर तक्रारीही केल्या आहेत. 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकार भाऊ कदमची लेक मृण्मयी कदमने (Mrunmayee Kadam) सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांना साद घातली आहे. काय आहे तिची पोस्ट?

मृण्मयीने एक पोस्ट शेअर केली आहे. "समोरच्याला April Fool बनवून मजा घेणं ही आता विकृत सवय झालीये. जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरातल्या stuffy साठी ४ एप्रिलचा World Stray Animal Day हाच खरा एप्रिल फूल चा दिवस ठरणारे. कुठल्यातरी नशेत काही माणसं या stuffy ला कसंही मारतात, त्याच्या अंगावर पाय देतात, शेपटीला इजा करतात. आणि आता हा कुत्रा चावतो अशी तक्रार केल्यामुळे BMC ने तिथून त्याला उचलून नेलं आहे. असं अचानक पकडून नेलेल्या निराधार, मुक्या STUFFY ची रोजची फरफट आमच्या डोळ्यासमोर सुरु आहे. त्याला परत आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण यात आम्हाला तुमचीसुद्धा मदत हवीये. World Stray Animal Day च्या आधी लवकरात लवकर जर याबद्दल आवाज नाही उठवला तर त्याला कायमचं गमावून बसू. Stuffy ला बोलता येत नाही. त्याचं म्हणणं आपण पोहचवलंच पाहिजे. प्रत्येकाने शेअर करा. आपल्याला त्याला वाचवायचं आहे."

मृण्मयीने सर्वांनाच साद घालत stuffy ला वाचवण्याची विनंती या पोस्टमधून केलेली दिसते. याशिवाय अनेक मराठी सेलिब्रिटींनीही पुढे येत आवाज उठवला आहे. काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखनेही एक पोस्ट करत कुत्र्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला होता. अशा लोकांना केवळ 50 रुपये दंड घेऊन सोडलं जातं यावरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

टॅग्स :भाऊ कदमसोशल मीडियाकुत्रा