Join us

लग्नाआधीच ब्रेकअप?

By admin | Updated: March 22, 2017 01:06 IST

मध्यंतरी आपली लाडकी सोना अर्थात सोनाक्षी सिन्हा लग्न करणार, अशा बातम्या आपल्या कानावर आल्या. पण, आता लग्नाआधीच

मध्यंतरी आपली लाडकी सोना अर्थात सोनाक्षी सिन्हा लग्न करणार, अशा बातम्या आपल्या कानावर आल्या. पण, आता लग्नाआधीच सोना व तिचा कथित बॉयफे्रंड बंटी सचदेव या दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी कळते आहे. अलीकडे सोनाक्षी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’च्या सक्सेस पार्टीमध्ये दिसली होती. या पार्टीत सोनाक्षी ‘मी आता सिंगल आहे,’ असे म्हणाली होती.अगदी आत्ता-आत्ता बंटी सचदेव याची बहीण सीमा खान (सलमान खानचा भाऊ सोहेल खान याची पत्नी) हिच्या वाढदिवसाच्या पार्टीत सोनाक्षी हजर होती. बंटीच्या आईच्या ६०व्या वाढदिवसालाही सोनाक्षीने हजेरी लावली होती. इतकेच नाही, तर गेले न्यू ईयरही दोघांनी दुबईत सेलिब्रेट केले होते.या पश्चातही मी सिंगल आहे, असे सोनाक्षी अलीकडे सांगताना दिसत आहे. कदाचित, पर्सनल स्पेस मेंटेन करण्यासाठी सोना असे सांगत असावी. कारण लवकरच सोनाचा ‘नूर’ हा सिनेमा येतोय. या सिनेमाचे प्रमोशन लवकरच सुरू होणार आहे. यासाठी आपण सिंगल असल्याची बतावणी सोना करत असावी.