Join us  

Confirmed! 'ब्रह्मास्त्र २'मध्ये रणवीर सिंगची एन्ट्री, साकारणार रणबीरच्या वडिलांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 12:07 PM

'ब्रह्मास्त्र २'मध्ये रणवीर सिंग रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

२०२२मध्ये प्रदर्शित झालेला 'ब्रह्मास्त्र' चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय, अमिताभ बच्चन, नागार्जुन अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अयान मुखर्जी दिग्दर्शित  'ब्रह्मास्त्र'च्या दुसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरू आहे. 'ब्रह्मास्त्र भाग १ : शिवा' नंतर आता 'ब्रह्मास्त्र २'च्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. आता या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर कपूरने शिवा ही भूमिका साकारली आहे. तर आलिया ईशाच्या भूमिकेत आहे. 'ब्रह्मास्त्र २'मध्ये रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत कोण दिसणार? याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ऋतिक रोशन किंवा दाक्षिणात्य अभिनेत्याची रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेसाठी वर्णी लागू शकते अशा चर्चा होत्या. पण, आता मीडिया रिपोर्टनुसार रणवीर सिंगची 'ब्रह्मास्त्र २'मध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे 'ब्रह्मास्त्र २'मध्ये रणवीर सिंग रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

'न्यूज १८'ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर सिंग 'ब्रह्मास्त्र २'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'ब्रह्मास्त्र २'मध्ये रणबीर कपूरच्या वडिलांची म्हणजेच देव ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे 'ब्रह्मास्त्र २'मध्ये रणवीर सिंग रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमाने देशात २६९.४ कोटींचा गल्ला जमवला होता. तर जगभरात ४३१ कोटींची कमाई केली होती. सध्या अयान 'वॉर २'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे 'ब्रह्मास्त्र २'साठी प्रेक्षकांना आणखी थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगरणबीर कपूरब्रह्मास्त्र