Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेत्रीचा सेक्स टेप विकण्याचा प्रयत्न केला बॉयफ्रेंडने

By admin | Updated: March 20, 2017 21:07 IST

दोघांनी एकांतात घालवलेल्या खासगी क्षणांचा व्हिडिओ त्याने पॉर्नसाइडला विकला आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले होते.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - १९९७ मध्ये आलेल्या लॉन डॉग्स या हॉलिवूडपटात मुख्य भूमिका साकारणी मीशा बार्टनला आपल्या एक्स बॉयफ्रेंडने दगा दिला आहे. दोघांनी एकांतात घालवलेल्या खासगी क्षणांचा व्हिडिओ त्याने पॉर्नसाइडला विकला आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतर मिशाच्या एक्स बॉफ्रेंडने एकांतात घालवलेल्या खासगी क्षणांचा व्हिडिओ पॉर्न साईड वाल्यांना विकून पैसे कमवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण मिशाला समजताच तिने कायदेशिर कारवाई केली आहे. पण या सेक्स व्हिडिओमुळे हॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हॉलिवूड अभिनेत्री मीशाने दिलेल्या माहितीनुसार तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्यासोबत व्यतित केलेल्या खासगी क्षणांचा व्हिडीओ काढून तो एका पोर्न साइट्सला विकण्याचा प्रयत्न केला. मीशा बार्टन सध्या तिच्या आयुष्यातील अतिशय वाईट काळाचा सामना करीत आहे असेच म्हणावे लागेल. कथित व्हिडीओसाठी ऑनलाइन पॉर्न कंपन्यांकडून बोली लावण्याचे काम सुरू असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मात्र मीशाने कारवाई केल्यानंतर या कंपन्यांनी तूर्तास माघार घेतल्याचे बोलले जात आहे. पप्स, स्किप्ड पार्ट्स, ऑक्टेन आणि विर्जन टेरिटरी यांसारख्या सिनेमांमध्ये मिशाने अभिनय केला आहे. आता ती या व्हिडीओ प्रकरणामुळे चर्चेत आली असून, कायद्याचा आधार घेऊन ती या प्रकरणाचा छडा लावणार असल्याचे तिने बोलून दाखविले आहे. न्यूज एजन्सी आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, मीशाने सांगितले की, हा माझ्यासाठी खूपच कठीण काळ आहे. कारण जेव्हा मला कळले की, ज्या व्यक्तीवर मी प्रेम केले, जिच्यावर मी विश्वास ठेवला तिनेच माझ्यासोबतच्या खासगी क्षणांचा हिडन कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडीओ शूट करून तो विकला तेव्हा मला खूपच दु:ख झाले. हा व्हिडीओ पब्लिकली करताना त्याने थोडासादेखील विचार केला नाही का? असा प्रश्नही मीशाने उपस्थित केला.