Join us

‘फितूर’च्या प्रतिसादाने बॉक्सआॅफीस आश्चर्यचकित

By admin | Updated: February 18, 2016 07:45 IST

नुकताच रिलीज झालेल्या फितूर चित्रपटाच्या प्रेमात प्रेक्षक पडले आहेत. कॅटरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांची जोडी प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंत केली जात आहे.

नुकताच रिलीज झालेल्या फितूर चित्रपटाच्या प्रेमात प्रेक्षक पडले आहेत. कॅटरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांची जोडी प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंत केली जात आहे. काही समीक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. समीक्षक म्हणत आहेत की, ‘दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी जी कथा मांडली ती खरंच कौतुकास्पद आहे. या प्रेमकहाणीत प्रेमीयुगुलाचा जो एक वेदनामय प्रवास दाखवला आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीने दाखवला आहे. या चित्रपटाला ‘आऊट आॅफ द बॉक्स’ चित्रपट म्हणून म्हणण्यात आले आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून केवळ चित्रपटाची प्रशंसा सुरू आहे. बॉक्स आॅफीसवर आणि प्रेक्षकांमध्येही चित्रपट, स्टोरी, कथानक, अभिनय यांना दाद देण्यात येत आहे.