Join us  

श्रीदेवींचे पार्थिव भारतात आणण्यासाठी पाकिस्तानच्या या अभिनेत्यानं केली होती मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 3:55 PM

दुबईमध्ये न्यायालयीन प्रक्रियेमुळं श्रीदेवींचे पार्थिव भारतात तीन दिवसानंतर आले.

नवी दिल्ली - आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरातील चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविलेली अभिनेत्री श्रीदेवी बुधवारी अनंतात विलीन झाल्या. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत सरकारी इतमामात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी 24 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळ्या बातम्या आल्या. सोमवारी आलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचे समोर आलं. दुबई पोलिसांनी कसून चौकशी केली. 

या सर्व घटना घडत असताना श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी बोनी कपूर यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं होते. यावेळी त्यांना एका पाकिस्तान कलाकाराने मदत केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याला बंदी असतानाही त्या कलाकारांनी माणुसकी दाखवत मदत केली आहे.  दुबईमध्ये न्यायालयीन प्रक्रियेमुळं श्रीदेवींचे पार्थिव भारतात तीन दिवसांनंतर आले. कपूर घराण्यातील प्रत्येक सदस्य आणि दुबईतील भारतीय दूतावासाचे प्रयत्न होते लवकरात लवकर श्रीदेवींचे पार्थिव भारतात जावे. या क्षणी श्रीदेवीचा मॉम चित्रपटातील सहकलाकर अदनान सिद्दीकी यांनी बोनी कपूर यांना मदत केली. 

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनूसार, ज्यावेळी श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी आली त्यावेळी अदनान लगेच त्या हॉटेलमध्ये पोहचले. अदनान त्यावेळी दुबईमध्येच उपस्थित होते. अदनान यांना श्रीदेवीच्या भाच्य्याच्या लग्नाचे आमंत्रण होते. आणि ते लग्नामध्ये उपस्थित होते. अदनान यांची दुबईत चांगली ओळख आहे. दुबई त्यांचे सेकंड होम आहे. श्रीदेवींच्या बाबातीत सर्व न्यायालयीन बाबीमध्ये त्यांनी मदत केली. अदनानने दुबईमध्ये ओळख असलेल्या सर्व मित्र आणि पाहुण्यांच्या मदतीने बोनी कपूर यांना मदतीचा हात दिला. श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यात अदनाना यांनी महत्वाची भूमिका बजावली. 

कपूर कुटुंबिंयासोबत अदनान यांचे जवळचे संबंध आहेत. बोनी कपूर आणि अदनान चांगले मित्र आहेत. श्रीदेवींच्या मृत्यूनंतर बोनी कपूरला अश्रू अनावर झाले होते. ते एखाद्या लहानमुलाप्रमाणे रडत होते असे अदनान यांनी सांगितले. एका मुलाखतीत बोलताना अदनान म्हणाले की, चार दिवसांपूर्वी मी श्रीदेवीच्या भाच्याच्या लग्नाला गेलो होते. लग्नामध्ये ती सुंदर दिसत होती. मला विश्वस बसत नाही त्या आता आपल्यात नाहीत. 

दुबईला जाण्यापूर्वी श्रीदेवी आजारी होत्या, मैत्रिणीचा खुलासा

सोमवारी आलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला. दुबईत कौटुंबिक सोहळ्यात श्रीदेवीने उत्साहाने भाग घेतला होता. भाच्याच्या लग्नात श्रीदेवी बेभान होवून नाचल्या होत्या, साजशृंगार केला त्या आज आपल्यात नाहीये ही कल्पनाच अनेकांना पटत नाही. मात्र दुबईत जाण्याआधी त्यांची तब्येत बरी नसल्याची माहिती पिंकी रेड्डी यांनी  मिड-डेला दिली आहे. 

मिड-डेच्या बातमीनुसार पिंकी रेड्डी श्रीदेवीच्या बालपणीच्या मैत्रिण आहेत.  दुबईमध्ये भाचा मोहित मारवाहच्या लग्नाला जाण्याआधी श्रीदेवीचे पिंकी रेड्डींशी बोलणे झाले होते. यावेळी श्रीदेवी यांनी आपल्याला आजाराविषयी सांगितल्याचे पिंकींनी म्हटले आहे. पिंकी म्हणाल्या, दुबईला जाण्याआधी माझे श्रीदेवींशी बोलणे झाले होते. त्यांना ताप होता आणि त्या अँटी बायोटिक्स घेत होत्या. त्या खूप थकल्यासारखे वाटत आहे, मात्र आपल्याला लग्नाला जावेच लागेल असे त्या म्हणाल्याचे पिंकी म्हणाल्या. 

श्रीदेवी यांचा प्रवास - 

श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. वडील पेशाने वकील होते. श्रीदेवी यांना एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. ‘थुनीवावन’ हा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवी यांची झलक दिसली होती. पण त्या या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हत्या. पण, 1983 मध्ये 'हिम्मतवाला' हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या.  1996 मध्ये  निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये  पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  मॉम हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 

श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट....जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम,मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता,जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी,चालबाज,खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह,लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश. 

टॅग्स :श्रीदेवीपाकिस्तान