Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षीतचा डान्स व्हिडीओ व्हायरल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 16:39 IST

माधुरी दिक्षीत ही एक अशी अभिनेत्री आहे जिने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिकांद्वारे आणि तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. तिचं नृत्यकौशल्य आणि दिलखेचक अदा पाहून आजही चाहत्यांच्या हृदयाची ‘धकधक’ वाढते.

लाखों दिलाची धडकन असलेली बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दिक्षीत हिच्या एका अदाने कित्येक हृदय घायाळ होतील..अर्थात तुम्ही याच्याशी सहमत असणारच काही शंकाच नाही..माधुरी दिक्षीत ही एक अशी अभिनेत्री आहे जिने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिकांद्वारे आणि तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. तिचं नृत्यकौशल्य आणि दिलखेचक अदा पाहून आजही चाहत्यांच्या हृदयाची ‘धकधक’ वाढते. माधुरीचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सर्वांना वेड लावले आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘थानेदार’ या चित्रपटातील ‘तम्मा तम्मा’ हे गाणं खूप गाजलं होतं. त्यामागचं कारण अर्थात माधुरीचा डान्स होता. त्याच गाण्यावर ५१ वर्षीय माधुरी तितक्याच उत्साहाने डान्स करताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. तिच्या या जबरदस्त डान्सपुढे नवनवे कलाकार सुद्धा फिके पडतील असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

‘तम्मा तम्मा’ या गाण्याचे ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ या चित्रपटामध्ये रिक्रिएटेड व्हर्जन पाहायला मिळालं. या गाण्यावर आलिया भट्ट आणि वरुण धवन थिरकले. त्याच्या शूटिंगपूर्वी माधुरीने त्यांना गाण्याच्या खास स्टेप्स शिकवल्या होत्या. विशेष म्हणजे आगामी ‘कलंक’ या चित्रपटात माधुरी आणि आलिया एकत्र डान्स करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या दोघींच्या अभिनय आणि नृत्याची जादू पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

टॅग्स :माधुरी दिक्षितनृत्य