Join us  

झी सिने पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 6:34 PM

झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन कार्तिक आर्यन आणि विकी कौशल यांनी केले.

ठळक मुद्देसंजू, पद्मावत या चित्रपटांनी या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली.

झी सिने पुरस्कारासाठी चित्रपट क्षेत्रातील अप्रतिम कामगिरी आणि चित्रपटीय भूमिकांमध्ये अपूर्व कामगिरी आणि मनोरंजन यांचे मिश्रण यांचा विचार केला जातो. सामान्य व्यक्तीचा असामान्य कलाकाराच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाचा वेध यात घेतला जातो. या पुरस्कारांच्या भव्य सोहळ्याचे यजमानपद यंदा मुंबईने भूषवले असून त्यात केवळ बॉलीवूडमधील दर्जेदार कलाकारच नव्हे, तर जागतिक स्तरावरील नामवंत व्यक्ती, जागतिक मीडिया आणि या चंदेरी दुनियेतील ग्लॅमर लाभलेले तारे हेही सहभागी झाले होते. 

 

झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन कार्तिक आर्यन आणि विकी कौशल यांनी केले. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांनी दमदार परफॉर्मन्स सादर केले. संजू, पद्मावत या चित्रपटांनी या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली. यंदा या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना प्रवेश खुला ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांना आपल्या आवडत्या कलाकारांना व्यासपीठावर थेट नाच-गाणे करताना पाहायला मिळाले. 

झी सिने पुरस्कार सोहळ्याचे विजेते

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकसंजय लीला भन्साळीपद्मावत

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दीपिका पादुकोणपद्मावत

सर्वोत्कृष्ट अभिनेतारणबीर कपूरसंजू

सर्वोत्कृष्ट अभिनेता (प्रेक्षकांची पसंती)रणवीर सिंगपद्मावत

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताविकी कौशलसंजू 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीकॅटरिना कैफझिरो

सर्वोत्कृष्ट परफॉर्मर ऑफ द इयरआयुषमान खुराणा

सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता)इशान खट्टरबियोंड ड क्लाऊड्स आणि धडक

सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री)जान्हवी कपूरधडक

सर्वोत्कृष्ट खलनायकतब्बूअंधाधुन

सर्वोत्कृष्ट कॉमिक रोलकार्तिक आर्यनसोनू के टिटू की स्वीटी

सामाजिक बदलासाठी योगदानसोनम कपूर आहूजा

सर्वोत्कृष्ट गायकयासीर देसाईनैनो ने बांधीगोल्ड

सर्वोत्कृष्ट गायिका विभा सराफ आणि हर्षदीप कौरदिलबरोराजी

सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक)अमर कौशिकस्त्री

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीघुमरपद्मावत

सर्वोत्कृष्ट संवादसुमीत अरोरास्त्री

सर्वोत्कृष्ट वीएफएक्स झिरो

भारतीय सिनेमाला दिलेल्या योगदानाबद्दल हेमा मालिनी यांना गौरवण्यात आले

 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणबीर कपूररणवीर सिंग