Join us  

बॉलिवूडमधून झाला गायब पण इंटरेस्टिंग आहे जायेद खानची लव्हस्टोरी; मलायकाला तिनदा केले होते प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 8:00 AM

‘खान’सोबत संधी मिळूनही फ्लॉप राहिला हा ‘खान’,  

ठळक मुद्दे2005 मध्ये जायेदने मलायका पारेखसोबत लग्न केले. एका मुलाखतीत जायेदने त्याच्या प्रेमकथेबद्दल सांगितले होते.

आज (5 जुलै) जायेद खानचा वाढदिवस. 5 जुलै 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या जायेद आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. संजय खान एकेकाळचा लोकप्रीय अभिनेते. त्यांनी आपला काळ गाजवला. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत, संजय खान यांचा मुलगा जायेद  खान याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. पण दुर्दैवाने जायेदला वडिलांसारखे स्टारडम मिळवता आले नाही. 

सिमोन, सुजैन (हृतिक रोशनची एक्स वाईफ), फराह या तीन बहिणींच्या पाठी जन्मलेल्या जायेदचे बालपण अतिशय लाडाकौतुकात गेले. घरात शेंडेफळ असल्याने त्याचे अमाप लाड झाले. डेहराडूनच्या वेल्हम ब्वॉईज स्कूल आणि तामिळनाडूच्या कोडाईकणाल इंटरनॅशल स्कूलमधून जायदने शिक्षण पूर्ण केले.

जायेदची पत्नी मलायका पारेखही याच स्कूलमध्ये शिकलीय. पुढील शिक्षणासाठी जायेद लंडनमध्ये गेला. येथील लंडन फिल्म अ‍ॅकेडमीत त्याने फिल्म मेकिंगचा कोर्सही केला. 

2005 मध्ये जायेदने मलायका पारेखसोबत लग्न केले. एका मुलाखतीत जायेदने त्याच्या प्रेमकथेबद्दल सांगितले होते. मी मलायकाला तीनदा प्रपोज केले होते. प्रत्येकवेळी मी तिला नवी रिंग दिली. या तिन्ही रिंग आजही तिच्याजवळ आहेत. सध्या जायेद व मलायका यांना जिदान व आरिज नावाची दोन मुले आहेत.

2003 मध्ये जायेदने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याचा निर्णय दिला. दिग्दर्शक संगीत सिवान यांच्या ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटातून त्याचा डेब्यू झाला. जायेदची बालपणीची मैत्रिण ईशा देओल ही त्याची या चित्रपटात हिरोईन होती. यानंतर  ‘शादी नंबर वन’, ‘दस’,‘फाईट क्लब’, ‘मिशन इस्तांबुल’ अशा अनेक चित्रपटात त्याची वर्णी लागली. सलमान खान सोबत ‘युवराज’ या चित्रपटातही तो झळकला. पण सलमानही जावेदची नौका तारू शकला नाही. २००४ मध्ये तो शाहरूख खानसोबत ‘मैं हू ना’मध्ये झळकला. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर अर्जुन रामपाल आणि अमीषा पटेल यांच्यासोबत तो ‘वादा’मध्ये दिसला. यापश्चात  शब्द , दस मध्येही त्याने काम केले. या चित्रपटातील त्याच्या कामाची बरीच प्रशंसा झाली. पण तरिही सपोर्टिंग हिरो इतकीच ओळख जायेदला मिळाली. यापलीकडे कुठलीही ओळख त्याला मिळाली नाही.  

जायेद खान दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. ‘मैं हू ना’ आणि ‘शब्द’ सारख्या चित्रपटात जायेद खान दिसला आणि नंतर अचानक दिसेनासा झाला. चित्रपटात यश मिळेनासे झाल्यावर जायेदने बी-टाऊनमधून एक्झिट घेतली. पण म्हणतात ना, अभिनयाचा किडा स्वस्थ बसू देत आहे. जायेदबद्दलही असेच काही म्हणता येईल. होय, कारण मोठ्या पडद्यावर यश मिळत नाही, म्हटल्यावर छोट्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय जायेदने घेतला.  ‘हासिल’ या शोमधून त्याने छोट्या पडद्यावर डेब्यू केला. अर्थात इथेही त्याला यश मिळू शकले नाही.

टॅग्स :जायेद खान