Join us

अभिनेत्री झरीन खान रुग्णालयात दाखल, डेंग्युमुळे बिघडली तब्येत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 11:47 IST

झरीन खानने स्वत: ही माहिती दिली आहे, तेव्हापासून तिचे चाहते काळजीत पडलेत.

सलमान खानच्या 'वीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या झरीन खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.स्वतः झरीनने इन्स्टाग्रामवर स्टोरीचा फोटो शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली आहे. जरीन खान सध्या रुग्णालयात दाखल आहे. अभिनेत्रीला डेंग्यू झाल्याचे निदान झाले असून तिला अंगी दुखी सोबतच ताप येतो आहे. 

झरीन खानने याआधी तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती ज्यामध्ये तिच्या हाताला सलाईन लावलेले दिसत होता. मात्र, नंतर अभिनेत्रीने ती स्टोरी डिलीट केली.  अभिनेत्रीने आणखी एक स्टोरी पोस्ट केली ज्यात ज्यूसचा ग्लास दिसतो. या फोटोसोबत झरीनने लिहिले- 'रिकव्हरी मोड'

झरीन खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांना डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्वच्छ आणि डासांना रोखण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करण्यास सांगितले आहे. मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

झरीनने १३ वर्षांपूर्वी कलाविश्वात पदार्पण केलं. वीर या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. मात्र, तिची तुलना कतरिना कैफसोबत होऊ लागली. जरीन बऱ्यापैकी कतरिनासारखी दिसत असल्यामुळे तिला लोक कतरिनाची कार्बन कॉपी म्हणतात. जरीन कलाविश्वात फारशी सक्रीय नाही. मात्र, सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.

टॅग्स :जरीन खान