Join us  

युवराज सिंगची पत्नी हेजल कीच हिने हॅरी पॉटर सीरिजमध्येही केलेय काम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 5:44 PM

क्रिकेटपटू युवराज सिंग याची पत्नी हेजल कीच हिने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम केलेय. पण हेजलने हॅरी पॉटर सीरिजमध्येही काम केलेय, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल.

क्रिकेटपटू युवराज सिंग याची पत्नी हेजल कीच हिने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम केलेय. पण हेजलने हॅरी पॉटर सीरिजमध्येही काम केलेय, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. होय, हेजलने हॅरी पॉटर सीरिजमध्ये काम केले आहे. अलीकडे गौरव कपूर आणि शिबानी दांडेकरच्या ‘मिस फिल्ड’ या चॅट शोमध्ये खुद्द हेजलने याचा खुलासा केला.

 बालकलाकार म्हणून मी हॅरी पॉटरच्या तीन सीरिजमध्ये काम केले आहे़. यात मी हॉगवर्ट्स स्कूलच्या विद्यार्थीनीची भूमिका साकारली होती. ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड फिलॉसॉफर्स स्टोन’, ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड द चेंबर आॅफ सीक्रेट्स’ आणि ‘हॅरी पॉटर द प्रिजनर आॅफ अझ्कबान’ अशा तीन चित्रपटात मी काम केलेय, असे हेजलने सांगितले. तो अनुभव शानदार होता. पाश्चिमात्य देशातल्या चित्रपटांत लहान-सहान गोष्टीही अतिशय गंभीरपणे घेतल्या जातात. त्यावेळी आम्हाला ट्युशन्स आणि टुटोरियल्स दिले गेले होते. कारण कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय १६ वर्षे वयापेक्षा कमी मुलांचा अभिनय करणे कठीण होते. प्रत्येकवेळी मेकअप अगदी सारखे व्हावे, याकडे तिने अतिशय काटेकोरपणे लक्ष दिले जाई, असेही हेजलने सांगितले.

हेजल आणि युवराजने नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. हेजलने बॉलिवूडसोबतच काही टॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे. करिना कपूर खान यांच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून हेजलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

टॅग्स :युवराज सिंग