Join us

​‘आँखे २’मध्ये अभिताभ साकारणार तरुण खलनायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 19:20 IST

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट ‘आँखे’ या चित्रपटाचा सिक्वल तयार करण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून ...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट ‘आँखे’ या चित्रपटाचा सिक्वल तयार करण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून यात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा लूकचा मेकओव्हर करण्यात येणार असून यात त्याची भूमिका तरुणपणाची असेल असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बझ्मी करणार आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटात अमिताभ बच्चन साकारत असलेल्या भूमिकेसाठी तयारी चालविली आहे. या चित्रपटात बच्चन तरुण दाखवण्यात येणार आहे. अमिताभ यांच्या तरुणपणाचे फोटो पाहून तसा लूक मिळविता यावा यासाठी मेकअप आर्टीस्ट चांगलीच मेहनत घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात अमिताभ साकारत असलेली भूमिका त्यांच्या हल्लीच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत आगळी वेगळी असेल असे सांगण्यात येत आहे. सध्या चर्चेत असलेल्या बातम्यानुसार ‘आँखे’च्या सिक्वलमध्ये अमिताभ बच्चन यांची बीची बॉडी लँग्वेज वेगळी असेल. यात त्यांचा आगळा वेगळा स्टाईल आयकॉन दिसणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या वयाला शोभेल अशी केशरचना बनवण्यात येणार आहे. त्याची वेशभूषाही खूपच महाग आणि उंची असणार आहे. त्याचा फर्स्ट लूक जेव्हा बाहेर येईल तेव्हा प्रेक्षक चकित होतील यासाठी निर्मात्याच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याचे सूत्राने सांगितले. या चित्रपटात अमिताभ खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येते. २००२ साली प्रदर्शित झालेला आँखे या चित्रपटात अमिताभ बच्चनसह अक्षय कुमार, अर्जुन रामपाल, परेश रावल यांच्या भूमिका होत्या तर आगामी आँखेच्या सिक्वलमध्ये त्याच्यासोबत अनिल कपूर, अर्जुन रामपाल, आर्शद वारसी, अभिषेक बच्चन, इलायाना डिक्रुझ व इशा गुप्ता यांच्या भूमिका असतील असे सांगण्यात येत आहे. दिग्दर्शक अनीस बझ्मी यांनी ‘आँखे २’च्या पटकथेवर काम करीत असल्याचा दुजोरा दिला आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित करण्याची तयारी निर्मात्यांनी चालविली आहे.