Join us  

अनुष्का शर्माच्या ‘परी’चे नवे पोस्टर बघून तुमचा होईल थरकाप!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 8:51 AM

अनुष्का शर्माचा ‘परी’ हा हॉररपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात ती अतिशय भयानक अंदाजात बघावयास मिळणार आहे. आता तिच्या या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

नेहमीच असे म्हटले जाते की, बॉलिवूडमध्ये हॉरर चित्रपट फारसे चांगले बनविले जात नाही. तसेच बºयाचदा लोक असेही म्हणताना दिसतात की, बॉलिवूडमध्ये हॉरर जॉनरचा स्तर हॉलिवूडच्या तुलनेत फारच कमी आहे. मात्र अनुष्का शर्माचा आगामी ‘परी’ हा हॉरर चित्रपट असे म्हणणाºया लोकांची बोलती बंद करणार आहे. होय, २ मार्च रोजी प्रदर्शित होणाºया ‘परी’ने आताच बºयाच लोकांचा थरकाप उडविला आहे. एकापाठोपाठ एक टीजर आणि पोस्टर्स प्रदर्शित केले जात असल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता लागली आहे. ‘फिल्लोरी’ या चित्रपटात अनुष्काने आत्माची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच पसंत आली होती. मात्र ‘परी’मध्ये अनुष्काची भूमिका अगदी विपरीत आहे. कारण टीजरमध्ये ज्यापद्धतीने अनुष्काचे रूप दाखविण्यात आले त्यावरून तिच्या भूमिकेची गंभीरता लक्षात येते. कारण आतापर्यंत कधीही बघितला नसेल अशा अवतारात अनुष्का दिसत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांकडून तिच्या या नव्या अवताराला पसंतीही मिळत आहे. त्यामुळेच की काय आतापर्यंत तिच्या या चित्रपटाच्या टीजरला दहा मिलियनपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे.  दरम्यान, टीजरनंतर चित्रपटाचा नवा फोटो समोर आला आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनुष्का खूपच भयानक दिसत आहे. फोटोत अनुष्का नळाजवळ बसलेली दिसत असून, त्यातून पाणी वाहत आहे. हा फोटो बघून प्रेक्षक हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की, अनुष्का अखेर याठिकाणी काय करीत असेल?‘परी’ हा चित्रपट अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाउस अंतर्गत बनविण्यात आला आहे. एक निर्माता म्हणून अनुष्काचा हा तिसरा चित्रपट आहे. या अगोदर तिच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत ‘एनएच१०’ आणि ‘फिल्लौरी’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. दरम्यान, ‘परी’मध्ये तिच्यासोबत परमब्रता चॅटर्जीचीही मुख्य भूमिका आहे, तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रॉसी रॉय यांनी केले आहे.