प्रभासच्या ‘साहो’मध्ये मंदिरा बेदीला कशी संधी मिळाली हे वाचून तुम्हाला धक्का बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 21:16 IST
काही दिवसांपूर्वीच हे स्पष्ट झाले होते की, ‘बाहुबली’ प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटात अभिनेत्री मंदिरा बेदी बघावयास मिळणार आहे. ...
प्रभासच्या ‘साहो’मध्ये मंदिरा बेदीला कशी संधी मिळाली हे वाचून तुम्हाला धक्का बसेल!
काही दिवसांपूर्वीच हे स्पष्ट झाले होते की, ‘बाहुबली’ प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटात अभिनेत्री मंदिरा बेदी बघावयास मिळणार आहे. मात्र हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे की, अखेर मंदिराला प्रभासचा हा चित्रपट मिळाला तरी कसा? आता याचा खुलासा झाला असून, मंदिराला हा चित्रपट कसा मिळाला हे वाचून तुमचाही त्यावर विश्वास बसणार नाही. हिंदुस्तान टाइम्समध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मंदिराने म्हटले की, ‘साहोचे दिग्दर्शक मला सोशल मीडियावर फॉलो करतात. तसेच वर्कआउट आणि फिटनेसच्या माध्यमातून ते मला भेटतही असतात. इन्स्टावर मी अपलोड केलेले सर्व फोटोज् त्यांना चांगले वाटतात. हेच फोटो बघून त्यांनी मला चित्रपटात संधी देण्याचे ठरविले.’ कदाचित मंदिराचे हे वक्तव्य ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु हे पूर्णत: खरे आहे. मंदिराने याविषयी अधिक विस्तृतपणे सांगताना म्हटले की, ‘मला एका कास्टिंग डायरेक्टरचा कॉल आला होता. त्याच्या तीन दिवसांनंतर मी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटली. यावेळी त्यांनी मला चित्रपटाचा विषय सांगितला. हा एक मोठा प्रोजेक्ट असल्याने मी लगेचच त्यांना होकार देत हा चित्रपट साइन केला.’ ‘साहो’मध्ये मंदिरा बेदी एका गॅँगस्टरची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, मंदिराने चित्रपटातील एक-दोन सीक्वेंसही शूट केले आहेत. हा चित्रपट खूप मोठ्या स्केलवर शूट केला जात आहे. चित्रपटात प्रभास आणि मंदिरा व्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, श्रद्धा कपूर आणि नील नितीन मुकेश यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची शूटिंग आबुधाबी, मुंबई, हैदराबाद आणि रोमानिया याठिकाणी केली जाणार आहे. नुकतेच प्रभासने शूटिंगला सुरुवात केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने याबाबतची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली होती. ‘बाहुबली’च्या अफाट यशानंतर प्रभास ‘साहो’मध्ये काम करीत आहे. प्रेक्षकांना त्याच्या या चित्रपटाची प्रचंड आतुरता लागली आहे.