Join us

सुशांतच्या गर्लफ्रेंडने महेश भट्टसोबत 'तो' फोटो शेअर करताच उठली होती टीकेची झोड, फोटो पाहून तुम्हालाही येईल संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 13:50 IST

महेश भट्ट यांना शुभेच्छा देण्यासाठी शेअर केलेला हा फोटो तिला चांगलाच महागात पडला. फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होते.

बॉलिवूडमध्ये स्चार बनयाचे असेल तर गॉडफादर शिवाय पर्याय नाही याची जाण रियाला होतीच. यशाची पायरी चढताना रियाला महेश भट्ट यांनी मदत केली. म्हणून महेश भट्ट यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत रियाने महेश भट्ट यांच्यासह क्लिक केलेला फोटो शेअर करत म्हटले होते की, आपल्याला करिअरमध्ये त्यांनी योग्य दिशा दाखवली, योग्य मार्गदर्शन केले असे सांगत रियाने त्यांचे पोस्टद्वारे आभार मानले. त्यांच्या फोटोसोबतच तिने भावूक संदेशसुद्धा लिहिला होता. 

 

हा फोटो रियाने सोशल मीडियावर पोस्ट करताच इतका व्हायरल झाला की, महेश भट्टसह असा फोटो पाहून अनेकांनी जोरदार टीका केली. महेश भट्ट यांना शुभेच्छा देण्यासाठी शेअर केलेला हा फोटो तिला चांगलाच महागात पडला. फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. या फोटोंवरून नेटीझन्सच्या संतप्त प्रतिक्रीया उमटल्याचे पाहायला मिळाले. अनेकांना हा फोटो रूचला नाही म्हणून तिच्यावर टीकेची झोड उठली होती. 

रियाने शेअर केलेल्या फोटोत महेश यांनी तिच्या खांद्यावर डोके ठेवलेले होते. फोटो पाहून एका युजर लिहिले होते. ‘जवान लडके खतम हो गये क्या?’ असा सवाल करत एका युजरने रियाची खिल्ली उडवली होती. यावर रियाने या ट्रोलर्सला खरमरीत उत्तरही दिले होते. ‘तू कौन है, तेरा नाम क्या? सीता भी यहां बदनाम हुई..ट्रोल करने वालों क्या तुम लोगों को नहीं पता की, तुम जैसे हो, तुम दुनिया को भी वैसे ही देखत हो...,’ असे तिने लिहिले होते.

 

निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या सुशांतला बाहेर काढण्याचा प्रयत्न रियाने (चक्रवर्ती) अनेकदा केला. सुशांतने औषध वेळेवर घ्यावीत योग्य उपचार घ्यावेत यासाठी सतत ती त्याच्या मागे लागायची. मात्र त्याने औषधं घेणं बंद केलं होतं. सुशांतला वेगेवेगळ्या व्यक्तींचाही आवाज ऐकू यायचा असो तो सांगायचा त्यावेळी भट्ट यांनीच रियाला सुशांतचे घर सोडण्यास सांगितले अशा चर्चा आहेत.

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतमहेश भट