Join us  

जेव्हा रेस्टॉरंटमध्ये शॉर्ट ड्रेस घालून पोहोचली मलायका, तिच्यावरून चाहत्यांच्या नजरा हटतच नव्हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 11:37 AM

मलायकाने  परिधान केलेल्या शॉर्ट ड्रेसमध्ये अजिबात कम्फर्टेबल नव्हती. रेस्टॉरंट बाहेर पडत  असताना ती तिचा ड्रेस वारंवार सावरताना कॅमे-यात कैद झाली.

छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा नेहमीच तिच्या स्टायलिस्ट लूकमुळे चर्चेचा विषय ठरते. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायकाचा स्टायलिश अंदाज पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटो खूप व्हायरल होत असतात. यावर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो.  45 वर्षांच्या  वयातही स्वत:ला तिने  खूप चांगले फिट ठेवले आहे. तिचा बिकिनी अंदाजातील लूक पाहून चाहते अक्षरक्षः फिदा होतात. तिचा  बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडतो सोशल मीडियावर असे फोटो पोस्ट होताच काही तासांत या फोटोंना हजारो लाईक्स आणि कमेंटस मिळतात.

 मलायका जिथे जाते तिथे तिने घातलेल्या ड्रेसची आणि तिच्या लूकची नेहमीच चर्चा होते. मात्र एकदा मलायकाने  परिधान केलेल्या शॉर्ट ड्रेसमध्ये अजिबात कम्फर्टेबल नव्हती. रेस्टॉरंट बाहेर पडत  असताना ती तिचा ड्रेस वारंवार सावरताना कॅमे-यात कैद झाली. एरव्ही बिनधास्त असलेली मलायका त्या दिवशी मात्र तिच्या चेह-यावर नर्व्हस भाव उमटले होते.

त्यामुळे  याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं त्या दिवशी मलायका बरोबरही घडले होते. 

टॅग्स :मलायका अरोरा