Join us  

'उरी' चित्रपटात योगेश सोमण यांनी साकारली 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 6:15 PM

अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक'चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे११ जानेवारीला होणार 'उरी' चित्रपट प्रदर्शितयोगेश सोमण संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या भूमिकेतराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्या भूमिकेत परेश रावल

 जम्मू काश्मीरच्या 'उरी' येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित हा 'उरी' सिनेमा आहे. यात विकी कौशल आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात संरक्षणमंत्र्यांची भूमिका मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता योगेश सोमण यांनी साकारली आहे. योगेश सोमण यांनी उरी चित्रपटात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भूमिका बजावताना दिसणार आहेत. या टीझरमध्ये त्यांची झलक पाहायला मिळते.

१८ सप्टेंबर २०१६ मध्ये उरीतील लष्करी कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ११ दिवसांनी लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पीओकेत घुसून दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त केली होती. या हल्ल्यात अनेक दहशतवादी प्रशिक्षणाचे तळ नष्ट करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले सर्व जवान नंतर सुरक्षितपणे भारतात परतले होते. योगेश सोमण यांनी सोशल मीडियावर  'उरी' चित्रपटाचा टीझर शेअर करून संरक्षण मंत्री रवींद्र अग्निहोत्रीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले आहे.११ जानेवारी रोजी 'उरी' हा चित्रपट प्रदर्शित होणार असून विकी कौशल व यामीसोबतच चित्रपटात मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी स्क्रूवाला हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्या भूमिकेत परेश रावल झळकणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत. 

टॅग्स :विकी कौशलयामी गौतम