योगदिनी सोहा अली खानने चमकोगिरी करणाºयांना फटकारले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 21:24 IST
आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. या दिवसाचे निमित्त साधून बॉलिवूडमधील बºयाचशा सेलेब्सनी योगा करतानाचे फोटोज् सोशल ...
योगदिनी सोहा अली खानने चमकोगिरी करणाºयांना फटकारले!
आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. या दिवसाचे निमित्त साधून बॉलिवूडमधील बºयाचशा सेलेब्सनी योगा करतानाचे फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले. सेलेब्स व्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो बघून ही सर्व मंडळी जणूकाही योगाचे महत्त्व पटवून देण्याचा संदेश देत होती. निरोगी आयुष्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे, हे प्रत्येक सेलिब्रिटी सांगताना दिसत होता. या सेलिब्रिटींच्या यादीत पतोडी परिवाराची मुलगी सोहा अली खान हिचेही नाव जोडले गेले. कारण तिने योगा करतानाचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले. मात्र सोहाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ट्विस्ट असल्याने तिचे हे फोटो दिवसभर चर्चेत राहिले. वास्तविक सोहा अली खानने तिचे जे फोटो ट्विटरवर शेअर केलेत त्याला तिने एक खास कॅप्शन दिले. कॅप्शनमध्ये सोहाने लिहिले की, ‘या आंतरराष्ट्रीय योगादिनी केवळ फोटोग्राफर्सकरिता योगा करू नका तर स्वत:च्या आरोग्यासाठी योगा करा.’ सोहाचे हे ट्विट त्या लोकांसाठी होते, ज्यांनी केवळ फोटो काढून स्वत:ला मिरविण्यासाठी योगा केला. वास्तविक सोहाने हे ट्विट करून चमकोगिरी करणाºयांनाच फटकारले. परंतु तिचे हे फटकारणे नेमके कोणाला होते, याचा अंदाज लावणे मुश्कील आहे. सोहाविषयी सांगायचे झाल्यास सध्या ती गर्भवती असून, नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी तयार आहे. काही दिवसांपूर्वीच सोहाचा पती कुणाल खेमू याने पिंकविलाशी बोलताना म्हटले होते की, ‘माझी पत्नी सोहा गर्भवती आहे. सोहा गर्भवती असल्याच्या ज्या बातम्या समोर येत आहेत, त्या सत्य आहेत. सोहा आणि मला या गोष्टीची घोषणा करताना आनंद होत आहे की, आम्ही नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खूप उत्साहित आहोत. आम्ही आमच्या चाहत्यांचे आभार मानतो की, त्यांनी आमच्या परिवारासाठी प्रार्थना केली.