होय,‘ही’ गोष्ट येत असेल तर तुम्हीही बघू शकता जॅकलिन फर्नांडिससोबत लग्नाचे स्वप्न!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 12:21 IST
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या ‘अ जेंटलमॅन’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. केवळ या चित्रपटातच नाही तर ...
होय,‘ही’ गोष्ट येत असेल तर तुम्हीही बघू शकता जॅकलिन फर्नांडिससोबत लग्नाचे स्वप्न!!
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या ‘अ जेंटलमॅन’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. केवळ या चित्रपटातच नाही तर रिअल लाईफमध्येही जॅकलिनला एका ‘जेंटलमॅन’चा शोध आहे. पण जॅकलिनच्या आयुष्यात येणाºया या ‘जेंटलमॅन’कडे एक गुण असणे मात्र आवश्यक आहे. होय, कारण ही एक गोष्ट असेल तरच जॅकच्या आयुष्यात त्याला एन्ट्री आहे. ही गोष्ट कोणती तर, त्याला चांगले जेवण बनवता यायला हवे.अलीकडे एका मुलाखतीत खुद्द जॅकलिननेच खुद्द नवºयाबद्दलच्या तिच्या या अपेक्षा बोलून दाखवल्या. रिअल लाईफमध्ये तुला कसा ‘जेंटलमॅन’ हवा? असा प्रश्न तिला केला गेला यावर, जॅकलिनने तिच्या अपेक्षा सांगितल्या. माझ्या प्रत्येक निर्णयामागे खंबीरपणे उभा राहणारा, मला गरज असेल तेव्हा मला सोबत करणारा, कुठलाही मुखवटा नसणारा एक सच्चा ‘जेंटलमॅन’ मला हवा आहे. त्याला ट्रव्हलिंग आवडत असावे आणि मुख्य म्हणजे त्याला कुकिंग यायलाच हवे, असे ती म्हणाली. आता कुकिंगची अट का? तर जॅकलिन स्वत: खाण्याची प्रचंड शौकीन आहे. आता अशात थकून भागून घरी आल्यावर नवºयाच्या हातचे रूचकर जेवण खायला कुणाला आवडणार नाही. तूर्तास तरी असा कुठलाच जेंटलमॅन जॅकच्या आयुष्यात नाही. त्यामुळे तिने सांगितलेल्या अपेक्षांच्या चौकटीत तुम्ही फिट बसत असाल तर ट्राय करायला हरकत नाही? काय? ALSO READ : ‘अ जेंटलमॅन’मधून कापला जाणार जॅकलिन फर्नांडिसचा सेक्सी पोल डान्स!लवकरच जॅकलिनचा ‘अ जेंटलमॅन’ हा चित्रपट येतोय. यात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. यात जॅकचा कधी नव्हे असा अॅक्शन अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. याशिवाय ‘जुडवा2’ या चित्रपटातही ती बिझी आहे. यात वरूण धवन जॅकचा हिरो आहे.