Join us  

सोशल मीडियावर करण जोहरच्या मुलांची धमाल, यश आणि रुहीचा अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल सो क्यूट...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 2:00 PM

Karan Johar shares adorable pictures of his baby posers: यश आणि रुही दोघांची मस्ती चाहत्यांना देखील आवडत आहे. नेहमीच सोशल मीडियावर या मुलांचे व्हिडीओ करण चाहत्यांसह शेअर करतो. सर्वाधिक स्टारकिडसच्या व्हिडीओंना पसंती करणच्याच मुलांना मिळत असल्याचे पाहायला मिळते.

२०१७ साली करण जोहर सरोगसीच्या माध्यमातून पिता बनला होता. यश आणि रुही या जुळ्यांचं करणच्या आयुष्यात आगमन झालं होतं. मुलांच्या जन्मानंतर रुही आणि यश हेच माझं विश्व आहे आणि त्यासाठी इतर कामं मी कमी करणार आहे, अशा भावना त्यानं व्यक्त केल्या होत्या. मुलांच्या येण्याने करण जोहरचे आयुष्यच पालटले आहे. त्याचा संगळा वेळ त्यांच्याबरोबरच तो घालवतो.

 

यश आणि रुही यांचे फोटो करण सोशल मीडियावर शेअर करतो. या मुलांच्या फोटोंना वर नेहमीच चाहत्यांच्या रभरुन लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. सोशल मीडियावर यश आणि रुही  इतर स्टार किड्सना त्यांच्या क्युटनेसमध्ये  टक्कर देत आहेत. नुकतेच करणने यश आणि रुहीचा नवीन फोटो शेअर केला आहे. लहान मुलं म्हटली की, धम्माल मस्ती ओघाने आलीच.अशाच मस्तीच्या मूडमधला यश आणि रुहीचा हा फोटो आहे.

यश आणि रुही दोघांची मस्ती चाहत्यांना देखील आवडत आहे. नेहमीच सोशल मीडियावर या मुलांचे व्हिडीओ करण चाहत्यांसह शेअर करतो. सर्वाधिक स्टारकिडसच्या व्हिडीओंना पसंती करणच्याच मुलांना मिळत असल्याचे पाहायला मिळते. लॉकडाऊन दरम्यान त्याने जास्त वेळ मुलांसह आणि आईसह घालवला.

 

त्याचदरम्यान त्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. शेअर झालेल्या व्हिडीओत करण मुलांसोबत रॅपीड फायर खेळताना दिसला होता. त्यानं विचारलेल्या प्रश्नांना रुही आणि यश यांनी दिलेली उत्तरं चाहत्यांची मनं जिंकली होती. 

करण जोहर होता या अभिनेत्रीच्या प्रेमात, आज ती आहे एका सुपरस्टारची पत्नी

करण जोहरचे अभिनेत्री ट्विंकल खन्नावर प्रचंड प्रेम होते. ट्विंकल ही अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आहे.ट्विंकल आणि करण हे लहानपणापासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत.ते दोघे एकाच शाळेत शिकत होते. करणला ट्विंकल खूप आवडायची आणि त्याला तिच्यासोबत लग्न देखील करायचे होते. ही गोष्ट अक्षय कुमारला देखील माहीत असून यावरून त्याने कॉफी विथ करण या कार्यक्रमात करणची टर देखील उडवली होती. 

टॅग्स :करण जोहर